फ्लॅटचे खरेदी अग्रीमेंट होऊन, तसेच ४३ लाख रुपये देऊन देखील तीन वर्षांनंतरही फ्लॅटचा ताबा दिला नाही. या प्रकरणी बिल्डरवर सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनी सांगवी सॅम्युएल प्रकाश राव (वय ४१, रा.जुनी सांगवी) यांनी गुरुवारी (दि.२७) या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सी ॲन्ड सी निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरचे रवींद्र सुधाकर चव्हाण (रा. धायरी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

फिर्यादी राव यांनी नोव्हेंबर २०१६ रोजी आंगण उष:काल सोसायटी, जुनी सांगवी या ठिकाणी २ बीएचके फ्लॅट खरेदी केला. त्याचा ताबा ऑगस्ट २०१७ मध्ये मिळणार होता.

फिर्यादी यांनी आरोपी बिल्डरला वेळोवेळी ४३ लाख रुपये दिले. तरीही आजपर्यंत फ्लॅट ताबा न देता फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांकडे दिली.

Advertisement