बनावट औषधांची निर्मिती करून जिल्ह्यातील विके्रत्यांना विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील उमेद फार्मा सेल्सविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदीप सुरेशकुमार मुखर्जी (वय ३२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. प्रभाकर नामदेव पाटील असे अटक केलेल्याचे नाव आहे. अशी विवेक खेडकर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हिमाचल प्रदेशातील मॅक्सरिलीफ हेल्शकेअर व्हिलेज अंजी येथील बनावट कंपनीच्या नावाने औषधांची निर्मिती केली.

Advertisement

त्यानंतर उमेद फार्मा सेल्सच्या वतीने पुणे आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरील विके्रत्यांना विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ तपास करीत आहेत.