Mauni Rai's
Mauni Rai's

अभिनेत्री मौनी राॅयनं तिचा बाॅयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी आज 27 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न केलं आहे.

तसेच या दोघांनी लग्नातील फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. मौनी रॉय ही एक अतिशय सुंदर दिसणारी अभिनेत्री आहे.

तिचे सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. मौनीनं लग्नात परिधान केलेल्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत असून तिच्या कपड्यांवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Advertisement

तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मौनीच्या लग्नाची चर्चा चालू आहे. लग्नातील तिचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

मौनीने आपल्या लग्नात पांढऱ्या रंगाची आणि लाल काठ असणारी साडी नेसली आहे.

मौनी रॉय पारंपरिक दागिन्यांनी नटली आहे. या मल्याळम लुकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे.

Advertisement