राजेंद्र जगताप निवृत्त झाल्यानंतर पीएमपीला अध्यक्ष नव्हता. दहा दिवस हे पद रिक्त होते.अतिरिक्त अधिका-याकडं पीएमपीची जबाबदारी होती; परंतु पीएमपीच्या कारभाराची व्याप्ती पाहता प्रभारी अधिका-याला ती पेलवणे शक्यच नव्हते.

त्यामुळं कारभारात गोंधळ उडाला होता. अखेर राज्य सरकारने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली.

प्रशासकीय अनुभव

मिश्रा हे २०१२ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. नाशिक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांची रत्नागिरीत जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली.

Advertisement

आता त्यांची पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालपदावर नियुक्ती झाली आहे. मिश्रा मूळचे ओरिसाचे आहेत. त्यांचे शिक्षण तमिळनाडूत झाले. मराठीही ते उत्तम बोलतात.

पन्नास टक्केच बस रस्त्यावर

गेल्या १४ वर्षांत पीएमपीला १६ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यात फक्त एकाच अधिकाऱ्याला कार्यकाळ पूर्ण करता आला होता.

पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्याच्या काही भागासाठी पीएमपी ही रक्तवाहिनी समजली जाते. या तिन्ही ठिकाणी पीएमपीची सेवा आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस आहेत.

Advertisement

त्यातील सुमारे १६५० बस रस्त्यावर असतात. कोरोनापूर्व काळात सुमारे ११ लाख प्रवासी पीएमपीचा रोज वापर करीत होते. सध्या ५० टक्के पीएमपीच्या बस ५० टक्के प्रवासी क्षमतेने सुरू आहेत.

 

Advertisement