वाट पौर्णिमा हा एक हिंदू सण आहे, ज्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी व्रत करतात. वट पौर्णिमेला वट सावित्री असेही म्हणतात, कारण या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवान यांचे जीवन यमराजा कडून परत आणले होते.

यावेळी वट पौर्णिमा २४ जून रोजी आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा केली जाते. पश्चिम भारतात गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हा सण साजरा केला जातो.

या दिवशी विवाहित महिला उपवास ठेवतात आणि सावित्री-सत्यवान कथा ऐकतात. यासह, लाल धागा घेतात आणि तो वटवृक्षावर बांधतात , आणि बांधताना 108 फेऱ्या वृक्षाभोवती मारतात.

Advertisement

वट सावित्रीची व्रत कथा

या व्रताचे नाव सावित्री च्या नावावर ठेवले गेले होते जिने आपल्या पतीच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी यमराजबरोबर युद्ध केले. वट म्हणजे वडाचे झाड जिथे सावित्रीने पुन्हा तिच्या नवऱ्याचे आयुष्य मिळवले.

ही कथा महाभारतातही सांगितली गेली आहे ज्यात सावित्री एक सुंदर आणि हुशार मुलगी होती. जिच्या वडिलांनी तिला वर निवडण्याची आज्ञा केली होती. एके दिवशी तिला जंगलात सत्यवान सापडला, जो आपल्या आंधळ्या आई-वडिलांना खांद्यांवर घेऊन चालला होता आणि त्याच्यावर मोहित होऊन सावित्रीने सत्यवानशी लग्न केले.

एक दिवस नारद आला आणि त्याने तिला सांगितले की तिचा नवरा तीन दिवसांत मरण पावेल . त्या दिवसापासून तिने आपल्या पतीसाठी उपवास सुरू केला.

Advertisement

एके दिवशी सत्यवान एका वटवृक्षावरुन लाकडे तोडत असताना खाली पडला, तेव्हा सावित्रीने पाहिले की तिचा नवरा मरत आहे आणि यमराज त्याचा जीव घेत आहे. मग सावित्रीने यमराजचा पाठपुरावा सुरू केला.

यमराजने तिला बर्‍याच वेळा परत जाण्यास सांगितले पण ती सहमत नव्हती. मग यमराजने तिला परत जाण्यासाठी तीन वरदान मागण्यास सांगितले. सावित्री सुंदरअसण्यासोबत हुशार होती, तिने तिच्या सासरी समृद्धी व्हावी असे पहिले वरदान मागितले .

दुसरे वरदान तिने आपल्या वडिलांची मुलाची इच्छा पूर्ण व्हावी असे मागितले , आणि तिसऱ्या वरदाना मध्ये तिने स्वत: साठी पुत्रप्राती व्हावी हे मागितले . यमराजने सर्व स्वीकारले.

Advertisement

मग सावित्री म्हणाली, मला माझ्या मुलासाठी फक्त माझा नवरा हवा आहे, यावर यमराज विचारात पडला आणि मग तो हसत म्हणाला तू जाऊन आपल्या पतीजवळ बस तो थोड्याच वेळात तो जागा होईल . अशाप्रकारे सावित्रीने आपल्या पतीचा जीव वाचविला .

सावित्री व्रताचा नियम

विवाहित महिला देवीसारखी सावित्रीची पूजा करतात. या दिवशी स्त्रिया प्रथम आंघोळ करतात आणि नवीन रंगाचे कपडे घालतात आणि पतिव्रतासारखा आवश्यक मेकअप करतात. वडाच्या झाडाचे एक पान आपल्या केसांमध्ये लावतात .

याशिवाय सावित्री देवीची 9 फळे आणि फुले घेऊन पूजा केली जाते. या बरोबरच डाळी, तांदूळ, आंबे, केळी आणि इतर फळांनी त्यांची पूजा केली जाते आणि सावित्रीची कथा वाचली व ऐकली जाते .

Advertisement

त्यानंतर त्या फळांचा नैवेद्य दिला जातो . स्त्रिया पती आणि घरातील वडीलजनांच्या आशीर्वाद घेऊन हा उपवास सोडतात .