कोण कुणाची कशी फसवणूक करील आणि कोण कसा फसविला जाईल, याचा भरवसा नाही. फसवणुकीसाठी आता वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. त्यात ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत.

भाडे देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

धानोरी येथील एका महिलेला ऑनलाईन भाडेकरू शोधणे चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने फ्लॅट भाड्याने देण्यासाठी एका वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर एका व्यक्तीने फ्लॅटचे भाडे देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली फसवणूक

याबाबत सुधोब नंदकुमार लोणकर (वय २४, रा. धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईने फ्लॅट भाड्याने देण्यासाठी एका खासगी बेवसाईटवर नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक टाकला होता. त्यावर एका व्यक्तीने फोन केला.

त्यांचा फ्लॅट भाड्याने घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. भाडे व डिपॉझिटची रक्कम ठरल्यानंतर आरोपीने त्यांना ऑनलाई पैसे पाठवितो, असे सांगितले.

त्यासाठी त्यांना फोन पे अथवा गुगल पे चा क्रमांक मागितला. त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे गुगल पे असल्याचे सांगितले.

Advertisement

आरोपींनी त्यांना पहिल्यांदा त्याच्या क्रमांकावर एक रूपया पाठविण्यास सांगितला. त्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यामधून दोन वेळा प्रत्येकी २५ हजार रूपये कमी झाल्याचा त्यांना मेसेज आला.

त्यांना काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्या आरोपीला फोन लावला असताना त्याने उचलला नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे समोर आले.

 

Advertisement