पिंपरी-चिंचवड – मागील काही दिवसांपासून पुणे शहर (Pune) आणि परिसरात आगीच्या (Fire News) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल पुन्हा एकदा शहारत आगीची (Fire News) घटना आहे. पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अश्यातच काल म्हणजेच शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Fire) दोन आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पहिली आगीची घटना आज दुपारी 1.28 वा पिंपरी मधील अजमेरा कॉलनी मध्ये झाली आहे. छाया हॉटेल जवळील डब्लू सेक्टर येथील ट्रान्सफॉर्मर ला आग लागली होती.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयातून एक अग्निशमन बंब घटनास्थळी आग विजवण्यासाठी पोहचला होता. थोड्या वेळातच ही आग विजवण्यात आली.

तर दुसरी आगीची घटना दुपारी 2.38 वा मोशी येथील बोऱ्हाडे वाडी मध्ये घडली आहे. घराबाहेर ठेवलेल्या वयरनच्या ढिगार्‍याला आग लागली होती.

अग्निशमन विभागाच्या चिखली स्थानकाचा एक अग्निशमन बंब घटनास्थळी आग विजवण्यासाठी पोहोचला होता. अंदाजे 30 मिनिटात आग विजवण्यात आली होती.

दरम्यान, काही दिवसांपासून वडगावशेरी परिसरात भीषण आग (Fire News) लागली होती. वडगावशेरी येथील सोपान नगर येथे एका गोडाउनला ही आग (Fire News) लागली होती.

अग्निशमनदलाच्या जवानांकडून बराच वेळ आग विझवण्याचं काम सुरु होतं. यावेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर ही भीषण आग आटोक्यात आली होती.

पुणे शहरात आणि परिसरात सध्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. साधारण दिवाळी पासून या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.