पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे शहर (Pune) आणि परिसरात आगीच्या (Fire News) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुन्हा एकदा शहरात आगीची (Fire News) घटना आहे. पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन ऑरगॅनिक लिमिटेड (Shogun Organic Limited) या कंपनीतील रिऍक्टरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात कंपनीतील तीन कामगार गंभीर जखमी (Three workers injured) झाले आहेत.

हा स्फोट इतका भयानक होता की कंपनीला लावण्यात आलेले पत्र्याचे तुकडे होऊन ते पुणे सोलापूर महामार्गावर येऊन पडले होते. यामध्ये तीन कामगारही होरपळले आहेत. या स्फोटात तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनीक प्रकिया करण्याचे काम केले जाते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान रिअक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे हा मोठा स्फोट झाला आहे.

या स्फोटावेळी अधिक कामगार उपस्थित नसल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे. यावेळी कंपनीत असणारे तीन कामगार होरपळले आहेत.

कुरकुंभ एमआयडीसीत (Kurkumbh midc) केमिकल कंपन्या मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या भागात वारंवार अशा प्रकारच्या घटना होत असतात. यामध्ये अनेकांना यापूर्वी आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत.

वारंवार अशा घटना होत असल्यामुळे आजूबाजूंच्या गावांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.