Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कळव्यात दरड कोसळून पाच ठार

मुंबईत कालच तीन ठिकाणी दरड कोसळून तीस जणांचा मृत्यू झाला असताना आज ठाणे जिल्ह्यातील कळवा इथं दरड कोसळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. आणखी एक जण अडकला आहे.

चार घरांचे नुकसान

मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार धडाका लावला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथं डोंगर परिसरात दरड कोसळली. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे.

यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.

Advertisement

या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.

ठाण्यात पूरजन्य परिस्थिती

गेल्या दिवसांपासून ठाण्यात पावसानं कहर केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.

ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पूरजन्य परिस्थिती आली आहे.

Advertisement

ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बाजारपेठ पाण्याखाली

हाजुरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठदेखील पाण्याखाली गेली आहे.

ठाणे शहराला लागून असलेला शीळ डायघर महामार्गदेखील पाण्याखाली गेला आहे. मागील तीन दिवसांपासून हा महामार्ग पाण्याखाली आहे. त्यामुळे रस्त्यावर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.

Advertisement
Leave a comment