ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

करन्सी प्रेसमधून पाच लाखांच्या नोटांना फुटले पाय

नाशिक येथील करन्सी प्रेसची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून काढीत आणि तिला चकवा देत पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्या.

या छापखान्याच्या अंतर्गत व्यवस्थापनानं चाैकशी करूनही हाती काहीच लागले नाही. आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मोठा घोटाळा असण्याची शक्यता

दोन आठवड्यांपूर्वी ही घटना घडूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी अधिका-यांची धावपळ सुरू होती.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून काढीत पाच लाख रुपये कुठे गेले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब होण्यामागे मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त होत आहे.

पाचशे रुपयांच्या नोटांचे दहा बंडल गायब

या छापखान्यातून पाचशे रुपयांच्या नोटांचे दहा बंडल गायब झाले आहेत. करन्सी नोट प्रशासनाने या प्रकाराची गोपनीय चौकशी सुरू केली आहे.

अंतर्गत चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई होते. तिथे १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते.

नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. रोज दोन- तीन वॅगन नोटा रवाना होतात.

 

You might also like
2 li