Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पाच लाख बाधितांचा टप्पा ओलांडला

शहरात कोरोनाचा धोका कायम असून शुक्रवारी (दि.२४) शहराने पाच लाख कोरोनाबाधितांचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, शुक्रवारी १२१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरात बाधितांची एकूण संख्या ५ लाख ८० इतकी झाली.

त्यामधून सुमारे ४ लाख ८९ हजार ४८५ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. शुक्रवारी ८ हजार ५०९ नागरिकांची तपासणी केली होती.

Advertisement

त्यातून १२१ नवे रुग्ण आढळले आहित. तर १७४ रुग्ण कोरोनामुक्‍्त झाले आहेत. सध्या शहरातील एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५८१ इतकी झाली आहे.

कोरोनामुळे शुक्रवारी शहरातील ३ तर शहराबाहेरील २ रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे ९ हजार १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Leave a comment