Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पाच अल्पवयीन मुलींना पळविले फूस लावून

पुणेः पुणे शहर व परिसरात मुलींना फूस लावून पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी एकाच दिवसांत पाच मुलींना फूस लावून पळविण्यात आल्याच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या.

सर्व मुली अल्पवयीन

कात्रज, कर्वेनगर, येरवडा, लोणीकंद, हडपसर परिसरात १६ ते १८ जून या कालावधीत या घटना घडल्या आहेत. त्यानुसार या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कात्रजमधील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्यात आले आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत कर्वेनगर परिसरातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडितेच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शोध सुरू

येरवड्यातील गांधीनगर परिसरातून अज्ञाताने १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे; तर लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. हडपसर परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेतला जात आहे.

Leave a comment