ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कैदी पलायनप्रकरणी फाैजदारासह पाच जण निलंबित

कैदी वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. त्याची शिक्षा पोलिसांना होते. आता ही येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने अभिवचन रजा कालावधीत पोलिसांच्या रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांची नावे

खात्याअंतर्गत प्राथमिक विभागीय चाैकशीनंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सचिन प्रल्हाद निबांळकर, पोलिस हवालदार बाळू रामचंद्र मुरकुटे, कर्मचारी शरद नाथा मोकाते, महावीर लक्ष्मण सामसे, किशोर चंद्रकांत नेवसे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबतचे आदेश प्रशासनचे अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी दिले आहेत. तर वेदप्रकाशसिंग विरेंन्द्रकुमार सिंग (मु.पो. गोलवरा उत्तरप्रदेश) असे पलानय केलेल्या कैद्याचे नाव आहे.

दक्षता घेण्याच्या सूचनेला अक्षदा

वेदप्रकाशसिंग हा येरवडा कारागृत एका गुन्ह्यात शिक्षा भोगतो आहे. मुलीच्या लग्नासाठी त्याला त्याच्या मूळ गावी गोलवारा (सराय अचल),जि. सुलतानपुर उत्तर प्रदेश येथे हजर राहण्यासाठी सात दिवसाची तातडीची अभिवचन रजा कारागृह उपमहानिरीक्षकांनी मंजूर केली होती.

त्यानुसार वेदप्रकाशसिंगला लग्नकार्यास हजर ठेवण्यासाठी कारागृहाकडून आरोपी पार्टीसाठी मागणीपत्र मिळाले होते. त्यासाठी पाच जणांची नेमणूक केली होती. आरोपी पार्टी कैद्याला घेऊन त्याच्या मूळ गावी गेले होते. या वेळी सर्वांना योग्य दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हलगर्जीपणा नडला

15 मे रोजी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास कैदी वेदप्रकाशसिंग याने राहत्या घराच्या खिडकीचे लोखंडी गजाचे स्क्रू काढून बाहेरील जाळी कापून रखवालीतून पलायन केले. याबाबत केलेल्या प्राथमिक विभागीय चाैकशीत आरोपी पार्टीने केलेल्या बेजाबदार व हलगर्जीपणामुळे कैद्याने पलायन केल्याचे समोर आले.

 

You might also like
2 li