राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच पुणे जिल्ह्याच्या काही भागात पुरान थैमान घातले आहे. पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ४२० गावांना पुराचा फटका बसला आहे.

सातशे लोक स्थलांतरित

पुणे जिल्ह्यात पुराचा फटका बसलेल्या तब्बल 700 लोकांना प्रशासनानं स्थलांतरित केलं आहे. दुसरीकडे 3 हजार 114 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पाण्यात सहा जनावरे वाहून गेली. पुण्यात मुळशी आणि वेल्हा तालूक्याला पुराचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

Advertisement

भिडे पूल पाण्याखाली

मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने शिवणे पूल आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. सध्या खडकवासला धरणातून 9339 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

खडकवासला धरणक्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे.

भीमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. पुणे, जुन्नर, खेड या भागांत दमदार पाऊस कोसळला.

Advertisement

भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजूच्या डोंगरातुन पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात पाणी साचलं आहे.

 

Advertisement