पुणे – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील (maharashtra rain) अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, काही जिल्ह्यांमध्ये (pune dist) तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) आणि इतर परिसरात (pune gramin) देखील गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम पावसाने ठोकला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला गुरुवारी (14 जुलै) मुसळधार पावसाचा लाल इशारा दिला आहे, तर शुक्रवारी नारंगी इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मढेघाट, माळशेज घाट. इ. अनेक ठिकाणे पर्यटकांना खुणावत आहेत.

अश्या ठिकाणी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. पूर्वमोसमी पाऊस आणि जून महिन्यात पाठ फिरवल्यानंतर दीर्घ कालावधीनंतर मोसमी पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे.

पर्यटन स्थळांवर सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन जीव गमावल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या घटना पावसाळ्यात वारंवार घडतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे तुम्ही सुद्धा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी घर बाहेर पडणार असणार तर, जिल्हा प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन नक्की करा. अन्यथा पोलिसांच्या कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.