कोळी हा एक कीटक आहे. आपण पाहतो सगळ्यांच्याच घरात कोपऱ्याच्या ठिकाणी कुठे ना कुठे तरी कोळीचे जाळे पाहायला मिळतेच. कोळी घरातील कपाटाच्या पाठीमागे व भिंतींवर सहजपणे वावरत असतात. पण अनेकवेळा असे होते ती माणसाच्या शरीराचा चावा घेतात.
कोळी चावल्यामुळे त्वचेवर लाल पुरळ आणि सूज येते. पण कोळी चावल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नाही. अशापरीस्थितीत जर तुम्हाला ती चावल्यास त्यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्हाला आराम मिळेल.
कोळी चावल्यावर या घरगुती उपायांचा अवलंब करा
जर तुम्हाला कोळी किंवा इतर काही कीटक चावला ज्याची तुम्हाला माहिती नाही, तर लगेच बर्फ किंवा इतर कोणत्याही थंड वस्तूने दाबा. तुम्ही एका सुती कपड्यात बर्फाचा तुकडा घालून त्या जागी लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होईल.
तुम्ही मीठ वापरू शकता. यासाठी प्रभावित भागावर मीठ लावून त्यावर पट्टी बांधावी. यामुळे वेदना आणि सूज मध्ये आराम मिळेल. मीठामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जखम भरण्यास मदत करतात.
हळद हे औषध मानले जाते. दुखापत किंवा कीटक चावल्यावर तुम्ही हळद वापरू शकता. ऑलिव्ह ऑइलमध्ये हळद मिसळा आणि कोळी चावलेल्या जागेवर लावा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
जर तुम्हाला काही समजत नसेल किंवा यापैकी कोणतीही गोष्ट वापरायची नसेल तर ती जागा साध्या कोमट पाण्याने स्वच्छ करून उघडी ठेवा. हे दिवसातून 2-3 वेळा करावे लागेल. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.