टाईमपास करण्यासाठी अनेकदा लोक त्याने जो छंद असतात ते करतात. जसे की व्हिडिओ गेम खेळणे, गाणी ऐकणे इ. पण तुम्ही कधी ऐकले आहे की कोणी टाईमपास करण्यासाठी लॉटरी खरेदी केलीये? आणि त्याने लॉटरी विकत घेतलीही तरी तो त्यात दहा लाख डॉलर्सचे बक्षीस जिंकू शकतो?

पण हे खरे आहे . अशीच एक घटना एका अमेरिकन महिलेबरोबर घडली आहे, जिने तिचे विमान रद्द झाल्यानंतर लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि 10 लाख डॉलरचे बक्षीस जिंकले. जाणून घ्या या महिलेची संपूर्ण कथा.

काही मिनिटांत नशीब बदलले

फ्लोरिडा लॉटरी स्क्रॅच-ऑफ तिकिटामध्ये 10 लाख डॉलर बक्षीस जिंकल्यावर मिसौरीच्या महिलेचे भाग्य काही मिनिटांत बदलले. तिची फ्लाइट रद्द झाल्यानंतर टाइम पाससाठी हे तिकीट खरेदी केले होते. ही महिला मिसौरीच्या कान्सास सिटी येथील 51 वर्षीय अँजेला कारवेला आहे, जिने गेल्या महिन्यात द फास्टेस्ट रोडवरून 1,000,000 डॉलर्सच्या स्क्रॅच-ऑफ गेममध्ये 10 लाख डॉलर्सचे टॉप बक्षीस जिंकले.

Advertisement

7.90 लाख डॉलर मिळतील

या दहा लाख डॉलर्सचे मूल्य भारतीय चलनात सुमारे 7.4 कोटी आहे. लॉटरीच्या बक्षीस रकमेचे पेमेंट घेण्याचे वेगवेगळे पर्याय होते, त्यापैकी अँजेला यांनी 7.90 लाख डॉलर एकत्र घेण्याचे ठरवले. ती म्हणते की माझी फ्लाइट अनपेक्षितपणे रद्द झाल्यानंतर काहीतरी विचित्र घडणार आहे अशी मला फिलिंग येत होती आणि झालेही तसेच अन ती श्रीमंत झाली.

टाइमपासने करोडपती बनवले

अँजेलाच्या मते, तिने टाइमपास साठी काही स्क्रॅच-ऑफ तिकिटे खरेदी केली आणि त्यामध्ये 10 लाख डॉलर जिंकले. टेंपा (फ्लोरिडा) च्या पूर्वेला ब्रॅंडन येथील पब्लिक्स सुपरमार्केटमधून अँजेलाने तिचे विजयी तिकीट खरेदी केले.

या विजयी तिकीटाच्या विक्रीसाठी स्टोअरला कमिशनमध्ये $ 2,000 चा बोनस मिळेल. अँजेलाने जिंकलेला यूएसडी 30 गेम फेब्रुवारी 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता आणि त्यात 10 लाख डॉलर्सची 155 टॉप पुरस्कार आणि 9.48 करोड़ डॉलर पेक्षा जास्त रोख बक्षिसे समाविष्ट आहेत.

Advertisement

बक्षीस जिंकण्याची किती शक्यता ?

या लॉटरीमध्ये बक्षीस जिंकण्याची शक्यता 2.79 मध्ये 1 अशी आहे. परंतु जर आपण 10 लाख डॉलरच्या बक्षीसाबद्दल बोललो तर हे बक्षीस जिंकण्याची शक्यता 270,717 पैकी 1 आहे. 1 लाख डॉलर जिंकण्याची शक्यता याहीपेक्षा कमी आहे. 4,196,106 पैकी फक्त एकच हे बक्षीस जिंकू शकतो. जिंकण्यासाठी 10 लाख डॉलरचे एकूण 155 बक्षिसे आहेत, तर 1 लाख डॉलरचे फक्त 10 तिकिटे आहेत.