पुणे : जिल्ह्याच्या आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील मंचर बस स्थानकात (Bus station) महिलांकडून शौचालयासाठी (Toilet) जबरदस्ती पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याची दाखल म्हणून राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली आहे.
एका युवकाने हा सर्व प्रकार ट्विटर च्या (Twitter) माध्यमातून समोर आणला आहे. या युकाचे नाव तेजस पडवळ (Tejas Padwal) आहे.
त्यांने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, परिवहन मंत्री अनिल परब(Transport Minister Anil Parab), गृहमंत्री दिलीप वळसेपाटील (Home Minister Dilip Walsepatil) आणि मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) टॅग केले आहे.
मंचर बस स्थानकात परप्रांतीय पुरुष महिलांकडून (Women) जबरदस्तीने पैसे घेत आहे आणि महिलांशी असभ्य बोल्ट आहे. हा पुरुष महिलांकडून ७ रुपये शौचालय वापरासाठी घेतो.
पैसे नाही दिले तर तो महिलांना शौचालय वापरण्यास देत नाही आणि त्यांच्या मागे जातो असा सर्व प्रकार तेजसने उघडकीस आणला आहे. रुपाली चाकणकर यांनी तेजसच्या ट्विट ला रिट्विट करत आजच दाखल घेतली जाईल अशी हमी दिली आहे.
आजच दखल घेतली जाईल https://t.co/LOm5ldbrWe
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 21, 2021
आता या शौचालय चालकावर, ठेकेदारावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.