पिंपरी- चिंचवड मध्ये पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत शहरातील काही लाॅज, तसेच स्पा सेंटरमध्ये छापे टाकले. यामध्ये काही पीडित महिलांची वेश्याव्यवसायामधून सुटका केली आहे.

या वेश्याव्यवसायामध्ये परदेशी महिलांचा समावेश आहे. या महिलांना पुणे शहरामध्ये कोण घेऊन येते? व यामागचे सूत्रधार कोण कोण आहेत.? याचा पोलीस तपास करत आहेत. यामध्ये पीडित तब्बल 22 परदेशी महिला होत्या. परंतु पोलीसांनी पीडित तरुणीची यामधून सुटका केली आहे.

पिंपरी -चिंचवडमध्ये याआधी देखील खूप वेळा पोलीसांनी लाॅज, तसेच स्पा सेंटरवर छापा मारत अनेक तरुणींची सुटका केली आहे .या प्रकरणी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली होती.

Advertisement

वेश्याव्यवसायातील दलाल तसेच मुख्य सुत्रधार यांचे जाळे पुण्यामध्ये सर्वत्र पसरले आहे . परंतु यामधील खूप जणांच्या मुसक्या पोलीसांनीआवळल्या आहेत. या पीडित महिला युगांडा, बांग्लादेश, व केनिया या देशातील आहेत. या महिला भाडेतत्त्वार घेतलेल्या घरात परदेशी नागरक वास्तव्य करतात.

यामुळे यातील काही परदेशी तरुणी वेश्याव्यवसायात ओढल्या जातात. वेश्याव्यवसायातून सुटका झाल्यानंतर या महिलांना समुपदेशन केंद्रात ठेवले जाते .

त्या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजीतून देखील समुपदेशन केले जाते. मात्र बहुतांश पीडित परदेशी महिलांना या भाषा अवगत नसतात. त्यांना केवळ त्यांच्या देशातील त्यांची बोलीभाषा समजते. त्यामुळे समुपदेनात अडचणी येतात.

Advertisement

या प्रकरणात स्थानिक लोकांचा समावेश असू शकतो. वेश्याव्यवसायाचे पुण्यामध्ये पसरलेले जाळे पोलीसांसाठी एक मोठा आव्हान बनले आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत.