Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

वन व्यवस्थापनावर २६ कोटी रुपये खर्च होणार

केंद्र सरकारने ग्रामीण भागात संयुक्त वन व्यवस्थापन योजना १९८८ मध्ये सुरू केली. त्याच धर्तीवर पुणे शहरात २००६ मध्ये वन खाते, पुणे महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने नागरी संयुक्त वन व्यवस्थापनाला सुरुवात झाली.

पाचगाव पर्वती, भांबुर्डे, वारजे येथील टेकड्यांवरील वनांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका, वन विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून ‘नागरी संयुक्त वन व्यवस्थापन योजने’ अंतर्गत पुढील पाच वर्षात तब्बल २५ कोटी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

पाच वर्षांसाठी निधी

संयुक्त वन व्यवस्थापनासाठी महापालिका आर्थिक मदत करत आहे. २००६ ते २०११ या कालावधीसाठी या योजनेसाठी १० कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी ९ कोटी ६१ लाख रुपयांची विकासकामे केली.

Advertisement

२०१४ ते २०१९ या कालावधीसाठी ४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी दिला होता, त्यातील २ कोटी ३१ लाखाचा निधी खर्ची पडला आहे. खर्च न झालेल्या रकमेवर सुमारे ६९ लाख ८५ हजार रुपयांचे व्याज जमा झाले आहे.

हा निधी नागरी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी निधी देण्याच्या प्रस्तावास वृक्ष संवर्धन समितीने जून महिन्यात मान्यता दिली होती.

९८८ एकर क्षेत्रावर वनसंवर्धनाचे काम

वन व्यवस्थपनाच्या धोरणास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रासने पुढे म्हणाले, ‘पुणे शहर व परिसरात एक हजार ८२६ एकरचे वनक्षेत्र आहे.

Advertisement

योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाचगाव-पर्वती, भांबुर्डा, आणि वारजे या तीन ठिकाणी ९८८ एकर क्षेत्रावर वनसंवर्धनाचे काम सुरू झाले.

दुसऱ्या या तीन ठिकाणांसह कोथरुड, धानोरी वनक्षेत्राचा समावेश केला जाणार आहेसुरक्षा भिंत बांधणे, वृक्षारोपण, रोपवाटीका, नालाबंडिंग, सुरक्षा रक्षक नेमणे अशा प्रकारची कामे करण्यात आली.’

 

Advertisement
Leave a comment