ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अट्टल गुन्हेगाराला खुनाची सुपारी देणा-या माजी नगरसेवकाला अटक

आपल्यावर गोळीबार करणा-याच्या हत्येची सुपारी देणा-या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा माजी नगरसेवक राजस्थानात होता.

हा आहे माजी नगरसेवक

आपल्यावरील गोळीबाराचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगारांना आरोपीच्या हत्येची सुपारी दिली होती. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा हा माजी नगरसेवक आहे. कोंढवा पोलिसांचे पथक मागील तीन दिवसांपासून संशयित आरोपीच्या मागावर होते.

विवेक यादव असे पोलिसांनी अटक केलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे, तर यापूर्वी राजन जॉन राजमनी (वय 38, रा.भाग्योदय नगर, कोंढवा), इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा काळा खडक, वाकड, पिंपरी-चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

इतर आरोपींना अगोदरच अटक

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड रजेवर येरवडा कारागृहाबाहेर आलेला सराईत गुन्हेगार राजन जॉन राजमनी व त्याचा मित्र इब्राहीम शेख या दोघांनी कोणाच्या तरी खुनाची सुपारी घेतली असून त्यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान, राजन राजमनी हा दुचाकीवरुन लुल्लानगर परिसरात फिरत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून राजन व इब्राहीमला अटक केली. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसे व सव्वा लाखाची रक्कम आढळली होती.

चार वर्षापूर्वी झाला होता गोळीबार

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा विवेक यादव याच्यावर चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्या बबलू गवळीला मारण्यासाठी यादवने सुपारी दिल्याची त्यांनी कबुली दिली.

राजनच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये व्हीके व व्हीके न्यू हे मोबाईल क्रमांक आढळले. दोन्ही मोबाईलवरील संभाषण पोलिसांना संशयास्पद वाटले.

 

You might also like
2 li