मुंबईः मंत्री किंवा माजी मंत्र्यांचा किती दरारा असतो, हे सर्वज्ञात आहे; परंतु माजी मंत्र्यांचा कुणी छळ करीत असेल, तर त्यावर विश्वास बसणार नाही; परंतु पुण्यात ते घडले आहे.

संपत्तीच्या वादातून वितुष्ट

शिवसेनेचे नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात व पत्नी- मुलामध्ये संपत्तीच्या वादातून वितुष्ट निर्माण झाल्याची बातमी समोर येत आहे.

शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे- लांडे यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट करत आई- भावावर गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

शिवतारे यांच्या कन्या अस्वस्थ

विजय शिवतारे यांच्या कन्या व आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी ममता शिवतारे- लांडे यांनी आज सकाळी वडिलांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहित हे आरोप केले आहेत.

‘माझ्या पित्याची माझ्याच भावानं संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून मी अत्यंत अस्वस्थ आहे,’ असं ममता यांनी म्हटलं आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

‘माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला; मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

Advertisement

कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असं त्यांना वाटत होतं व आजही वाटतं,’ असं ममता यांनी लिहिलं आहे.

आजारपणातही छळ केल्याचा आरोप

‘मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांची बायपास झाली. ऑपरेशन यशस्वी झालं; मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता.

मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायलासुद्धा आले नाही.

Advertisement

ते आहेत की नाही? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले.’ असा आरोप ममता यांनी केला आहे.