पिंपरी : चिंचवड परिसरात चार तास वीज गायब झाल्याने आधीच उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आणखी त्रस्त झाले.
महावितरण कंपनीची केबल शॉर्ट झाल्याने चिंचवड येथील पवनानगर आणि एसकेएफ कंपनी परिसरातील वीजपुरवठा रविवारी दुपारी जवळपास चार तास खंडित झाला होता.
साधारणपणे दुपारी साडेबारानंतर या परिसरातील केबल शॉट झाली. या परिसरात वरचेवर केबल शॉर्ट होत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे केबल बदलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीकडे केली.
सकाळपासून वीज याठिकाणी नव्हती. नागरिकांनी सम्पर्ग साधला असता दुपारी तीन वाजता येईल, असे महावितरण कंपनीकडून कळविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी सहा वाजले तरी वीज आलेली नव्हती.