Breaking News Updates of Pune

पुण्यातील बिबवेवाडी भागात चौघांनी केली सात वाहनांची तोडफोड

पुण्यातील बिबवेवाडी भागात चौघांनी सात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील पोकळी वस्ती जवळील बकुळा हॉल परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकी आणि तीन चाकी अशा सात गाड्या उभ्या होत्या.

त्यावेळी चौघे जण तिथे येऊन, काठ्या आणि लोखंडी गजाने त्यांनी या गाड्यांची तोडफोड केली. त्या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.