Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

ऑनलाईन डाळिंबे विकत घेण्याच्या नावाखाली श्रीगोंद्याच्या शेतक-याला गंडा

ऑनलाईन  डाळिंबे विकत घेण्याच्या नावाखाली नगर जिल्ह्यातील शेतक-याला नालासोपारा परिसरात बोलवून, नंतर प्रत्यक्षात त्याला पैशासाठी फिरवत ठेवून फसवणूक करण्यात आली.पोलिसांनी २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

गुन्हा दाखल

शेतकऱ्याचा शेतीचा माल ऑनलाईन विकत घेण्याचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.

याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना घेरत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

नेमकं प्रकरण काय ?

श्रीगोंदे तालुक्यातील हिंगेवाडी या गावचे शेतकरी अमोल दगडू परे यांचे डाळिंब ऑनलाईन खरेदी करण्याच्या नावाने फसवणूक करण्यात आली. आरोपींनी डाळिंब ऑनलाईन खरेदी केल्याचं सांगत शेतकऱ्याला माल घेऊन नालासोपाऱ्यात बोलावले.

शेतकऱ्याकडून त्यांनी 87 हजार 800 रुपयांचे 112 कॅरेट डाळिंब घेतले; पण डाळिंब घेतल्यानंतर भामट्यांनी शेतकऱ्याला पैशांसाठी फिरवाफिरव केली. आरोपींनी शेतकऱ्याची दिशाभूल केली. त्यानंतर ते फरार झाले.

शेतक-याची हतबलता

आरोपींकडून आपली फसवणूक झाली, याची जाणीव शेतकऱ्याला झाली. अखेर हतबल झालेल्या शेतकऱ्याने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याने नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलिस ठाणे गाठलं.

Advertisement

तिथे त्याने आपली तक्रार नोंद करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांकडे तक्रार दाखल करताना शेतकऱ्याची अस्वस्था आणि हतबलता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.

पोलिसांची धडाकेबाज कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तुलिंज पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यानंतर आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस करुन त्यांना हेरलं. त्यानंतर आरोपींना बेड्या ठोकल्या.

विशेष म्हणजे आरोपींनी अवघ्या 24 तासाच्या आता मालासह टेम्पो आणि दोन आरोपींना पकडण्यात यश मिळविले. प्रकाश उमेश चौधरी (वय 25), मोहम्मद अजय सलीन रायनी (वय 29) असे अटक आरोपींचे नाव असून हे राहणारे वसईचे आहेत.

Advertisement

पोलिसांनी दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात दाखल केले असताना त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

 

Advertisement
Leave a comment