येथील विवाहित महिलेला पोलिसाने एमपीएससीच्या अभ्यासाचे भुरळ पाडत मोठमोठी स्वप्ने दाखवली. परंतु महिलेच्या पतीला ही गोष्ठ समजताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

या महिलेला पोलीसाने एमपीएससीच्याअभ्यासासाठी पुण्याला पाठवले होते. सदर महिलेच्या पतीने देखील या पोलीस अधिकाऱ्यावर विश्वास ठेवत पत्नीला परवानगी दिली.

परंतु पुण्याला गेल्यावर पोलीसाने तिच्याशी संपर्क वाढवत जवळीक साधली. ही गोष्ठ पतीला समजताच त्याने पोलिसठाण्यात धाव घेऊन या पोलीसाकडून हात-पाय मोडण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

Advertisement

हे प्रकरण बारामतीमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. याबाबत बारामती पोलीसांनी या वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली केली आहे. 16 जानेवारी रोजी या अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर पतीला दिसला.

यावरून त्या दोघात वाद झाले होते.यांनतर पोलीस अधिकाऱ्याकडून ‘तुझे हात-पाय मोडीन’ . ‘मी तिला माझ्या कंपनीतील 10 टक्के वाटा देत आहे, तिला जर तू त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे’,

असे धमकीचे फोन महिलेच्या पतीला येऊ लागले.त्यामुळे हे रेकॉर्डिंग तिच्या पतीने व्हायरल केले आहे. दरम्यान हे प्रकरण गंभीर होत चालल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तक्रारदार याने ही गोष्ट भावंडांना सांगितली.

Advertisement

संबंधित कुटुंबाने लागलीच पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या सर्व प्रकाराचा महिलेच्या पतीला मोठा धक्का बसला असून त्याच्या दोन मुलांसाठी आई कोठून आणू? असा प्रश्न त्याला पडला आहे. याबाबत या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाईल,अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

Advertisement