Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

जमिनीचा ताबा न देता ५४ लाखांची फसवणूक

पिंपरी : जमिनीची संपूर्ण रक्‍कम घेऊन ठरलेल्या मुदतीत जमिनीचा ताबा न दिल्या प्रकरणी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ५ फेब्रुवारी २०१६ ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत रावेत येथे घडली. विजय येळवंडे, सागर भिमराव पवार (रा. कुरकुंभ, दौंड ), गिरिधर गायकवाड (रा. काळभोर नगर, चिंचवड ), कमलेश भटीचा (रा. औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी गुलाबहुसेन अब्दुल रहमान (वय ७१, रा. साईनाथ नगर, निगडी) यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत सेक्टर क्रमांक २६ येथील एका प्लॉटसाठी फिर्यादी यांच्याकडून ५४ लाख रुपये आरोपींनी घेतले.

Advertisement

प्लॉटसाठी संपूर्ण रक्कम घेऊन ठरलेल्या मुदतीत फिर्यादी यांना प्लॉटचा ताबा दिला गेला नाही, तसेच लेखी करार न देता संबंधित प्लॉटची विकसन करण्यासाठी परस्पर विक्री करण्यात आली.

Leave a comment