Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महिला बचत गटांची फसवणूक

बचत गटातील महिलांना हळद, मिरची पावडर, जिरे, मोहरी, वगैरे वस्तूंची अर्धा अर्धा किलो पॅकिंग करून द्यायची आहे.

कच्चा माल व पिशव्या आम्ही देणार, असे सांगुन कंपनीत नोंदणी करण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये घेऊन तांबे तसेच अंजनावळे आदी गावातून महिलांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आला.

फसवणूक करणा-यास अटक

बचत गटातील महिलांची फसवणूक करणाऱ्या जनसेवा लघु उद्योग विकास महाराष्ट्र या संस्थेच्या किशोर वशिष्ठ काळे या आरोपीस मोबाईल लोकेशनद्वारे जुन्नर पोलिसांनी शिताफीने पकडले.

Advertisement

जुन्नर न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत सुरेखा महेंद्र मडके (रा. तांबे ता.जुन्नर) यांनी त्यांच्या गावातील दोन बचत गटातील महिलांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली होती.

दोन महिला बचत गटांची फसवणूक

तालुक्यातील अंजनावळे, सोमतवाडी, तांबे, आंबे, हातवीज, माणिकडोह या गावातील बचत गटाच्या महिलांची आरोपी व त्याचे दोन पुरुष व दोन महिला साथीदारांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारीवरून जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली.

अन्य आरोपींचा शोध सुरू

जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी अंजनावळे येथील बचत गटातील महिलांसह जुन्नर पोलिस ठाण्यात येऊन आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती.

Advertisement

मोबाईल लोकेशननुसार आरोपीला बीड येथून आणण्यासाठी पोलिसांना गाडी दिली होती. जुन्नरचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलिस हवालदार मनीषा ताम्हाणे, अमोल शिंदे, भरत सूर्यवंशी यांनी बीड येथून आरोपीस पकडून आणले. अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

 

Advertisement
Leave a comment