Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

फुकट बिर्याणी क्लिपमुळे पोलिस दलातील शीतयुद्ध चव्हाट्यावर

पुण्याच्या पोलिस प्रियंका नारनवरे यांची फुकट बिर्याणीची ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

 

या ऑडिओ क्लिपमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून आता पोलिस दलातील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले आहे. नारनवरे यांनी ही आॅडिओ क्लिप व्हायरल करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

कारवाईने दुखावलेल्यांचे षडयंत्र

वसुली करणारा कॅट मोडून काढल्यामुळे दुखावलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप नारनवरे यांनी केला आहे. यामध्ये त्यांच्या जागी पूर्वी असलेल्या डीसीपीचे हितसंबंध असल्यानेच हा प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नारनवरे यांच्या आरोपामुळे पुणे पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर समोर आलं आहे.

गृहमंत्र्यांचे चाैकशीचे आदेश

नारनवरे यांना दरमहा 88 हजार रुपये पगार असताना त्यांनी एसपी बिर्याणीमधून बिर्याणीची आॅर्डर देताना हद्दीतील हाॅटेलला पैसे देण्याची गरजच काय असा सवाल या क्लिपमध्ये केला आहे. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा काळवंडली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चाैकशीचे आदेश दिले आहेत.

Advertisement

पोलिस आयुक्त गप्प

या ऑडिओ क्लिपने आधीच पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आता अधिका-यांमधल्या राजकारणातून हे घडल्याचं रेकॉर्डवर सांगणाऱ्या नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का असा प्रश्न आहे.

इतकं सगळं होऊनही पुण्याचे पोलिस आयुक्त गप्प आहेत. गृहमंत्र्यांनी चाैकशीचे आदेश देण्याअगोदरच पोलिस आयुक्तांनी चाैकशीचे आदेश दिले असते, तर थोडीतरी अब्रू वाचली असती.

 

Advertisement
Leave a comment