हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर परिसरातील कुप्रसिद्ध शुभम कामठे टोळीतील फरार आरोपी शुभम बरकडे याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. फुरसुंगी परिसरात तीन महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यातून कामठे टोळीतील दोन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता.

त्या गुन्ह्यात टोळीप्रमुख शुभम कैलास कामठे (रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) याला पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली होती. त्याचे साथीदार दत्ता भिमराव भंडारी (वय २४, रा. पापडेवस्ती, हडपसर), सौरभ विठ्ठल घोलप (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर),

ऋतिक विलास चौधरी (वय २१, रा. पापडेवस्ती, हडपसर), साहिल फकिरा शेख (वय २१, रा. पापडेवस्ती, हडपसर) यांना त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगारी व विध्वंसक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.

Advertisement

त्यातील शुभम भाऊसाहेब बरकडे (वय २३, रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) फरारी होता. तो लोणीकाळभोर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमित साळुंखे यांना मिळाली होती.