Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

विठ्ठल देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी गहिनीनाथ महाराज, प्रणिती शिंदेंचे नाव?

राज्य सरकारने महामंडळे आणि देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष तसंच संचालक, विश्वस्त मंडळासाठी नाव शोधायला सुरुवात केली आहे. साई संस्थान राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेल्यानं आता पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टवर काँग्रेसच्या कार्यकर्यांल्ची वर्णी लागणार आहे.

फडणवीस काळात राज्यमंत्रिपदाचा दर्जा

पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे.

भाजप सरकारच्या काळात या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.

सध्याची मंदिर समिती भाजप काळात अस्तित्वात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सर्व पदभार आहे.

गहिनीनाथ महाराजांचे नाव चर्चेत

महाविकास आघाडी सरकारने नव्या नियुक्त्या करणार हे घोषित केल्यानंतर पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे गेले आहे. त्यामुळे इथे कोणाची निवड होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे; पण विद्यमान सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नाव आघाडीवर आहे.

ते मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहेत. माघ वारीला त्यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायतील असल्याने सध्या त्यांचं नाव आघाडीवर आहे.

राजकीय क्षेत्रातून प्रणिती शिंदे, सत्यजीत तांबे

राजकीय क्षेत्रातून आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. पण वारकरी संप्रदायाशी निगडित हे देवस्थान असल्याने या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीऐवजी वारकरी संप्रदायाशी निगडित व्यक्तींना संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a comment