पुणे: कोण कशासाठी कोणती धमकी देईल, याचा भरवसा देता येत नाही. त्यामुळे पोलिसांचीही धावपळ होते. मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणा-या अशाच एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मुलीच्या ॲडमिशनसाठी उपद्व्याप

शाळेत मुलीचे ॲडमिशन न झाल्यामुळे शैलेश शिंदे याने ई-मेलवरून मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

पुणे पोलिसांनी घोरपडी येथून त्याला ताब्यात घेतले. शैलेशच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नसल्याने चिडलेल्या शैलेशने गृह विभागाला धमकीचा मेल केला, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

मंत्रालय परिसराच्या बंदोबस्तात वाढ

मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी संध्याकाळी सहा वाजता प्राप्त झाल्यानंतर श्वानपथकाडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला; मात्र कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही.

खबरदारी म्हणून मंत्रालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.