पुणे – पुणे पोलिसांसाठी (Pune Police) नेहमीच डोके दुखी ठरत असलेल्या अट्टल गुंड गज्या मारणेला ( Gajya Marne) पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या (Pune police) खंडणी विरोधी पथकाने गजानन मारणेच्या (gajanan marne) काही दिवसांपूर्वीच मुसक्या आवळल्या आहेत. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी कारवाई करत गुंड गज्या मारणेला (Gajya Marne) अटक केली होती.

शेयर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिलेल्या चार कोटींच्या बदल्यात वीस कोटींची मागणी करत पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला धमकी (Pune Crime News) दिली होती. त्या प्रकरणात गज्या मारणेसह त्याच्या टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आता गज्या मारणे टोळीतील रूपेश मारणे याच्यासह चौघा जणांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रूपेश कृष्णराव मारणे (वय 38, रा. एकता काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याच्यासह उमेश प्रसाद वाफगावकर (रा. यशराज अपार्टमेंट, तपोधाम सोसायटी, वारजे),

नितीन तुकाराम ननावरे (वय 41, रा. विंड बिल व्हिलेज बावधन), अनिल अंबादास लोळगे (वय 40, रा. गोल्डफिंच पेठ, नवी पेठ, सोलापूर,) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कोथरूड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.

बांधकाम व्यावसायिकाने मारणे आणि साथीदारांकडून एक कोटी 85 लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. त्या बदल्यात व्याजासह बांधकाम व्यावसायिकाने आरोपींना दोन कोटी 30 लाख रुपये परत केले होते.

त्यानंतर मारणे आणि साथीदारांनी त्यांच्याकडे आणखी 65 लाख रुपयांची मागणी केली. रूपेश मारणे याच्या सांगण्यावरून आरोपींनी कर्वेनगर भागातील एका गृहप्रकल्पातील 12 सदनिकांचा ताबा घेतला.

बांधकाम व्यावसायिकास सदनिका विक्रीस मनाई केली तसेच सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न केला, असे बांधकाम व्यावसायिकाने तक्रार अर्जात म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गज्या मारणे याच्यासह त्याच्या अन्य साधीदारांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी याबाबत आदेश दिला आहे.