पुणे – गणेशोत्सव (rules for Ganeshotsav) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, यासाठी काही ठराविक नियमावाली नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

पुणे शहर पोलिसांकाडून (pune police) गणेशोत्सवसाठी ही नियमावली जाहीर (rules for Ganeshotsav) करण्यात आली असून, गणेशोत्सवादरम्यान सर्वांनाच या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

काय आहेत? गणेशोत्सवसाठी नियमावली –

श्रींची मूर्ती स्थापना व आरास संदर्भात गणेश मंडळाने आपले मंडळ धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करुन घेणे आवश्यक असणार आहे.

गणपती स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक असणार आहे.

वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा न करण्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्त्याचा 1/3 भाग उपयोगात आणून बांधावा.

मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना प्राप्त करणे बंधनकारक असणार आहे.

मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबूत असावे.

तसेच श्री मूर्तीचे पाऊस व आगीपासून संरक्षणाची काळजी घ्यावी.

गणेश मूर्तीची उंची मर्यादित असावी.

कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. त

सेच वाळूच्या बादल्या भरून ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

सजावटीमध्ये हॅलोजेन सारखे प्रखर दिवे लावण्याचे टाळावेत.

प्रेक्षक, सुरक्षा रक्षक यांच्या डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

विद्युत प्रवाह खंडित झाल्यास जनरेटर असावे.

उत्सवामध्ये किंवा मिरवणुकीत देखव्या संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी.

संपूर्ण उत्सव काळात मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची यादी आणि रूपरेषा पोलिसांना आगाऊ कळवावी.

ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायलायकडून ठरवून दिलेल्या अटीनुसार असाव्यात

श्रींची मूर्ती किंवा सजावटीची देखभाल करण्यासाठी मंडळाचे 5 कार्यकर्ते अथवा सुरक्षा रक्षक 24 तास मंडपात नेमावे.

करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी मंडपासमोर योग्य दोर लावून ठेवाव्यात.

मंडळामध्ये अथवा मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मद्यपान करू नये.

वर्गणी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांवर जबरदस्ती करू नये.

गणेश विसर्जन मिरवणूक विहित वेळेत संपवावी.

मिरवणुकीत बैलगाडी किंवा इतर गाड्यांचा वापर करणे टाळावे.

लहान मुलांना पाण्याजवळ नेणे टाळावे.

गुलालाचा कमीत कमी वापर करावा.

मिरवणुकीवेळी प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त 2 बॉक्स कमानी उभारता येतील.