पुणे – गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या उत्सवात शहरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांकडून अनेक मोठे कार्यक्रम सादर करण्यात येतात. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे (corona) विषाणूच्या संसर्गामुळे सर्वच सण आणि कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आले आहे. मात्र, आता यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आपल्या सर्वांच्या जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, सगळीकडे आनंद दिसून येत आहे.

अश्यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणे शहरातील दगडूशेठ गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी (Dagdusheth Halwai Ganapati Trust) विरोध केला आहे.

त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) गणेशोत्सव साजरा करण्यावरून पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मतभेद असल्याचे दिसत असल्याचे यावरून समोर आले आहे.

पुण्यातील मानाच्या पाच आणि इतर तीन अशा अष्टविनायक मंडळांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत 2023 मध्ये जम्मू कश्मीर मधील आठ ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले.

मात्र आता या घोषणेला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने विरोध दर्शवला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पदाधिकारी म्हणाले की, “गणेशोत्सवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे असं सांगत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने विरोध दर्शवला आहे.

त्याचबरोबर आम्हाला विश्वासात न घेता ही घोषणा केला असल्याचा आरोप देखील दगडूशेठ गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार की नाही असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

काश्मिरात (Jammu Kashmir) श्रीनगर, लाल चौक, पुलवामा, कुपवडा, बारामुल्ला, अनंतनाग, खुरआमा, सोफियाम याठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे.