पुणे – बुधवारी 31 तारखेच्या म्हणजेच चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav) सण साजरा होत असून, गणपतीचे हे 10 दिवस मंगलमय असतात. घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची (Ganesh Utsav) विधिवत पूजा केली जाते तसेच, गोड पदार्थांचा आणि बाप्पाला आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

मात्र, आज दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन (Ganpati Visarjan) होत आहे, आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे.

हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा आज शेवटचा दिवस (Ganpati Visarjan) आहे.

लाडक्या बप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली असून, पुण्यात (pune) विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

मंडईतील टिळक पुतळ्यापासून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला (pune Ganpati Visarjan) सुरुवात झाली आहे.

मंडईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या (pune Ganpati Visarjan) मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तसेच बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पायघड्या देखील टाकण्यात आल्या आहेत.

मात्र, मिरवणूक लवकरात लवकर संपावी यासाठी मंडळांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी केले आहे.

विसर्जन मिरवणुकीत पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. 3 हजारांपेक्षा जास्त गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

तर, उद्या सकाळपर्यंत मिरवणूक (pune Ganpati Visarjan) संपेल, अशी आशा अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. लोकांच्या सेवा सुविधांचा विचार करून सगळी व्यवस्था केली आहे, असे ते म्हणाले.

तसेच, सकाळी सातपासून सगळे रस्ते काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी वळवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी (Amitabh Gupta) दिली आहे.