पुणे – बुधवारी 31 तारखेच्या म्हणजेच चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav) सण साजरा होत असून, गणपतीचे हे 10 दिवस मंगलमय असतात. घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची (Ganesh Utsav) विधिवत पूजा केली जाते तसेच, गोड पदार्थांचा आणि बाप्पाला आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

मात्र, आज दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन (Ganpati Visarjan) होत आहे, आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे.

हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा आज शेवटचा दिवस (Ganpati Visarjan) आहे.

लाडक्या बप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली असून, पुण्यात (pune) विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

मंडईतील टिळक पुतळ्यापासून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला (pune Ganpati Visarjan) सुरुवात होणार आहे.

मंडईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या (pune Ganpati Visarjan) मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तसेच बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पायघड्या देखील टाकण्यात आल्या आहेत.

पुण्यातील (pune) गणेशोत्सव राज्यासह देशभरात प्रसिद्ध असतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातून भव्य विसर्जन मिरवणुका निघतात. या मिरवणुका पहाण्यासाठी भाविक राज्याच्या काणाकोपऱ्यातून येत असतात.

तुळशीबागचा गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळसीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याचवेळात सुरुवात होणार आहे. मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.

तसेच, गुरुजी तालीम गणेशमंडळाचा गणपती हा पुण्यातील तीसरा मानाचा गणपती आहे. थोड्याच वेळात गुरुजी तालीम गणेशमंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.