पुणे – बुधवारी 31 तारखेच्या म्हणजेच चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav) सण साजरा होत असून, गणपतीचे हे 10 दिवस मंगलमय असतात. घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते तसेच, गोड पदार्थांचा आणि बाप्पाला आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

मात्र, आता उद्या दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन (Ganpati Visarjan) होणार आहे, उद्या अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे.

हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते. कुठलेही शुभ विधी किंवा कार्यक्रमापूर्वी गणपतीला वंदन केले जाते. आशा या प्रथम पूजनीय गणपतीच्या उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस (Ganpati Visarjan) आहे.

भक्त 10 दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात. आणि याच दिवशी पुणे शहरातील वाहतुकीत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

गणपती विसर्जन निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल –

आज गुरुवार संध्याकाळी 7 नंतर लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड (नारायण पेठ) यांना जोडणाऱ्या सर्व गल्ल्या बांबू लावून बंद करायला सुरुवात होईल.

तसेच जंगली महाराज रोड, FC रोड, नळ स्टॉप पासून डेक्कन पर्यंतचा कर्वे रोड, नदी पात्रातील रस्ता आज जॅम असणार आहे.

आज संध्याकाळी 5 वाजे पूर्वी आपली सर्व महत्वाची कामे उरकून घ्यावीत तसेच शनिवारी (10 सप्टेंबर) संध्याकाळी 5 वाजे पर्यंत गावातील रस्ते बंद/जॅम राहणार आहेत याची नोंद घेऊन त्या नुसार आपल्या कामाचे नियोजन करावे.