Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

आवक कमी झाल्याने गावरान हापूसचे दर तेजीत

पुणे : पावसाचा परिणाम आंब्याच्या आवकेवर झाला आहे. तसेच हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आता गावरान हापूस आंब्याच्या भावात वाढ झाली आहे.

वादळामुळे आंब्याचे मोठे नुकसान

नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आणि चवीला गोड असणाऱ्या गावरान हापूस आंब्याचा हंगाम अखेरच्या टप्यात आला आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने गावरान हापूसचे दर तेजीत आहेत.

भोर, मुळशी आणि वेल्हा तालुक्यात गावरान हापूसची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. रत्नागिरी हापूस आंबा हंगामाची अखेर झाल्यानंतर गावरान हापूसची आवक सुरू होते. मुळशी, भोर, वेल्हा तालुक्याला काही प्रमाणात चक्रीवादळाचा फटका बसला. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

आठवडाभर आवक सुरू राहणार

सध्या बाजारात तीस डाग आवक होत आहे. अजून एक आठवडाभर आवक सुरू राहील. वटपौर्णिमेपर्यंत गावरान हापूसला चांगली मागणी राहील. चक्रीवादळाचा फटका बसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत गावरान हापूसचे दर चढे आहेत.

घाऊक बाजारात गावरान हापूसला एक डझनाला ५०० ते ५५० रुपये, पायरीला ३०० रुपये, रायवळ ७० ते ८० रुपये भाव, तर किरकोळ बाजारात एक डझन गावरान हापूसची विक्री ६०० ते ७०० रुपये दराने केली जात आहे.

Leave a comment