ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

भाजपतून बाहेर पडा, मुख्यमंत्री करतो !

संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या कार्यक्रमात खासदार संभाजीराजे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर चिड़ून हे प्रश्न विचारायचे असतील, तर मला मुख्यमंत्री करा, असे संतापाने सांगितले.

तेच आव्हान स्वीकारून आता संभाजी ब्रिगेडने खासदार संभाजीराजे यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं… आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर दिले.

शिवानंद भानुसे काय म्हणाले ?

“बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार संभाजीराजे यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असं म्हटलं.

मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी खासदार संभाजीराजे यांना दिलं.

काय म्हणाले होते संभाजीराजे ?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल, तर आधी मला मुख्यंमंत्रिपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार खासदार संभाजीराजे यांनी केले.

बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला.

संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

संभाजीराजांच्या वक्तव्यावर जल्लोष

संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला.

तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा; मात्र त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही.

मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

 

You might also like
2 li