पुणे – अनेकांना सकाळी आल्याचा चहा प्यायल्याशिवाय (Ginger Side Effects) दिवसाची सुरवात करता येत नाही. आल्याशिवाय चहा अनेकांना आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या चहाची चव वाढवणाऱ्या आल्याचेही काही तोटे (Ginger Side Effects) आहेत. आलं खाण्याचे फायदे तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील, पण आज आम्ही तुम्हाला आले खाण्याचे तोटे (Ginger Side Effects) सांगणार आहोत.

– छातीत जळजळ

आलं मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. परंतु केवळ चवीपुरते आले जास्त खाल्ल्याने छातीत जळजळ, पोटदुखी इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

– रक्तस्त्राव

आले हिवाळ्यात जास्त खाल्ले जाते कारण ते गरम असते. त्यात अँटी प्लेटलेट्स असतात. आल्याच्या या गुणधर्मांमुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. याशिवाय अनेक लोक काळी मिरी, लवंगा यांसारख्या मसाल्यांसोबत आले खातात. अशा परिस्थितीत हा धोका आणखी वाढतो.

– अतिसार

खूप जास्त आले खाल्ल्याने तुमच्या आतड्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डायरिया होण्याची शक्यताही वाढते. आल्याचे सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांचाही रुग्ण होऊ शकतो.

– पोट खराब

आल्याचे सेवन कमी प्रमाणात आणि मर्यादित प्रमाणात केल्यास पचनशक्ती वाढते. पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचन बिघडू शकते. याच्या सेवनामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.