पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यांनी महाराष्ट्राबद्दल (Maharashtra) केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस (Congress) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या घराबाहेरही आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. काँग्रेसने गिरीश बापट यांच्या घराबाहेरील आंदोलन संपवल्यानंतर बापट यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
गिरीश बापट म्हणाले, आज आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते नव्हते ते माझे कार्यकर्ते होते होते. ते नेहमी मला मदत करतात, असा टोलाही बापट यांनी काँग्रेसला लगावला आहे.
तसेच गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) चिंता काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीत दोन चार लोकचं निर्णय घेतात. तो पक्ष परिवारवादी पक्ष आहे अशी टीका बापट यांनी केली आहे.
प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १५ मार्चला १६ नगरसेवक येणार असल्याचे म्हंटले होते त्याचाही समाचार गिरीश बापट यांनी घेतला आहे. जगताप यांनी दावा केलाय मात्र 16 मार्चला भेटू असे बापट म्हणाले आहेत.