मुंबई – “भाजपा पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख छाटत आहे. रोहिणी खडसेंच्या हे लक्षात आलं, पंकजा मुंडेंच्याही लक्षात यायला हवं, असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली आहे. त्यावर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

गिरीश महाजन म्हणाले, “पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज नाहीत. त्या कुठेही जाणार नाहीत. पण राष्ट्रवादीचे नेते आपल्या मनाचे बोल सांगत आहेत.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि सुप्रिया सुळे यांचे मनाचे मांडे खाणं सुरु आहे’. असं गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते जे बोलत आले ते सगळं कपोकल्पित आहे. पंकजाताईंसमोर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी ठेवलेला प्रस्ताव योग्य नाही.

त्याचा पंकजाताईंवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व पक्षांची राज्यात काय परिस्थिती आहे सर्वांना माहिची आहे’. असं देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी काय म्हणाले…

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईनं भाजपा पक्ष वाढला.पण त्यांच्याच मुलीला पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना हे लवकर कळलं. पंकजांनाही ते कळायला हवं.

आता बारा आमदारांची यादी राज्यपाल जाहीर करतील,त्यात पंकजांचं नाव नाही. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजपा कसे छाटतो हे यावरुन दिसतं. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तसंच पाऊल पंकजा मुंडेंनीही उचलावं” असं ते म्हणाले आहे.

ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींच्या आम्ही पाठीशी – सुप्रिया सुळे

“विरोधी पक्ष असले तरी सर्वांचे एकमेकांशी संबंध चांगले असले पाहिजेत’, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. ‘अमोल मिटकरी यांना जर एखादा चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरूर त्या संदर्भाने विचार करेल.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) ही महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान महिला आहे. त्या कोणत्याही पक्षात राहिल्या तरी माझ्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आणि प्रेम आयुष्यभर असेल, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.