पुणे : भाजप (BJP) नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जळगावच्या (Jalgav) मराठा विद्याप्रासारक संस्थेशी (Maratha Vidyaprasarak Sanstha) निगडीत वादात गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.

भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) जळगाव मध्ये छापे टाकले आहे.

या छापेमारीत (Raid) पोलिसांना या प्रकरणी टेम्पो (Tempo) भरून कागदपत्रे जप्त केली आहेत. या छापेमारीत कागदपत्रे सापडल्यामुळे गिरीश महाजन यांच्या अडचणीत (Difficulties) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

जळगावात जप्त केलेली सर्व कागदपत्रे पुणे पोलिसांनी पुण्यात आणली आहेत. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गिरीश महाजन यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.

जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेशी संबंधित हा वाद आहे. यामध्ये भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी ही सर्व कागदपत्रे सापडली आहेत. अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

Advertisement