Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पुरावे द्या, अजित पवारांविरोधात फिर्याद देतेः खा. सुळे

आंबील ओढा परिसरातील अतिक्रमण काढल्याच्या मुद्द्यावरचे राजकारण थांबायला तयार नाही. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीच्या वेळी गोंधळ घातला.

त्यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले. त्यावर खा. सुळे यांनी आरोप करू नका, पुरावे द्या, पुरावे दिले, तर मी स्वतः पोलिसांत फिर्याद देईन, असे सांगितले.

घोषणाबाजी आणि गोंधळ

आंबील ओढा परिसरातील कारवाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले होतं.

या वेळी सुळे यांनीदेखील आंदोलकांची भेट दिली; मात्र या वेळेला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला.

कशाच्या आधारावर आरोप करता ?

या वेळी ”बिल्डरदेखील अजित पवारांच्या जवळ असल्याने तुम्हीच आम्हाला न्याय द्या” अशी मागणी आंदोलकांनी या वेळी सुळे यांच्याकडे केली.

याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता सुळे यांनी ”कशाच्या आधारावर हे आरोप करताय, सगळे पुरावे द्या, मी त्यांची स्वतः पोलिस कंप्लेंट करेन” अशी प्रतिक्रिया दिली.

पवार मुर्दाबादच्या घोषणेमुळे गोंधळ

पुण्यात आंबील ओढा परिसरातील स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. १३० घरांवर कारवाई केली जाणार असल्यानं नागरिक आक्रमक झाले.

या आंदोलनावेळी जवळच असलेल्या आंदोलनाच्या भेटीला आलेल्या खा. सुळे यांनीदेखील भेट दिली; मात्र या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुळे यांना बघताच, ‘अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद” अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला.

Leave a comment