Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

२३ गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटी द्याः महापाैर

राज्य सरकारने २३ गावांचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत केल्याने पुणे ही आता सर्वांत मोठी महापालिका ठरली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी स्वागत केलं असून, विकासासाठी नऊ हजार कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.

विकासासाठी निधी द्या

राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागतच; अर्थसहाय्यही द्यावं. पुणे महापालिका राज्यातील सर्वांत मोठी हद्द असणारी महापालिका झाली असताना या गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, याला आमचे प्राधान्य असेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

“34 पैकी उरलेल्या 23 गावांचा समावेश व्हावा, ही आमची पूर्वीपासूनचीच मागणी होती. या 23 गावांच्या समावेशाबाबत पुणे महापालिका प्रशासनाला राज्य सरकारकडून अभिप्राय मागवण्यात आला होता.

त्यानुसार या गावांसाठी 9 हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने कळविले होते. त्यानुसार राज्य सरकारने अर्थसहाय्यची तरतूद करावी, म्हणजे या गावांच्या विकासाला चालना मिळेल.” असं ते म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात 11 गावांचा समावेश

“खरं तर ही गावे टप्प्या-टप्प्याने घ्यावीत अशी आमची भूमिका होती, म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना 2017 मध्ये 11 गावांचा समावेश केला होता. आताही 23 गावांच्या समावेशाचे आम्ही स्वागतच करतो, असं ते म्हणाले.

अजित पवारांचे प्रशासनाला निर्देश

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

 

Leave a comment