Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य : जाणून घ्या सविस्तर माहिती…

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)कडून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य योजना अमलात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र पहिल्या टप्प्यात यामध्ये देशातील २५६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे.

ज्या सराफांची वार्षिक उलाढाल ४० लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना अनिवार्य हॉलमार्किंगमधून सूट देण्यात आली आहे.भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)चे महासंचालक अनिवार्य हॉलमार्किंगच्या विविध पैलूंबद्दल माहिती देताना म्हणाले की, जिथे मूल्यमापन आणि हॉलमार्किंग केंद्रे आहेत त्या देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला सोन्याच्या दागिन्यांवर अनिवार्य हॉलमार्किंग सुरू केले आहे.

ते पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या व्यापार धोरणानुसार, दागिन्यांची निर्यात आणि पुनअरयात – आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी दागिने, शासकीय मान्यताप्राप्त बी 2 बी देशांतर्गत प्रदर्शनांसाठीच्या दागिन्यांनाही अनिवार्य हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येईल. घड्याळे, फाऊंटन पेन आणि दागिन्यांचे विशेष प्रकार उदा. कुंदन, पोल्की आणि जडाऊ यांना हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, सराफांची नोंदणी एकदाच होईल आणि या नोंदणीसाठी सराफांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मौल्यवान धातूंच्या वस्तूंच्या विक्रीशी संबंधित कोणताही उत्पादक, आयातदार, घाऊक विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता यांना बीआयएसकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र नोकरीच्या आधारावर सोन्याचे दागिने तयार करणारे आणि साखळीतील कोणाशीही थेट विक्रीशी संबंधित नाहीत,

त्या कारागीर किंवा उत्पादकांना नोंदणीतून सूट देण्यात आली आहे.भारतीय मानक ब्युरो ने यासंदर्भातील माहिती जाहीर केली. त्यानुसार हॉलमार्कच्या पहिल्या टप्प्यात उत्पादक, संपूर्ण विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोन्याच्या शुद्धतेची जबाबदारी घेऊन हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये दोन ग्रॅमपर्यंत वाढ किंवा घट यासंदर्भात सराफांना परवानगी देण्यात आली आहे.

हॉलमार्किंगसाठी सोन्याच्या शुद्धतेच्या श्रेणी वाढवण्याची मागणी सराफांकडून वाढली आहे. हे लक्षात घेता, हॉलमार्किंगसाठी अतिरिक्त कॅरेट्स म्हणजेच २०,२३ आणि २४ कॅरेटलाही अनुमती असणार आहे. घरांमध्ये उपलब्ध हॉलमार्क नसलेले जुने दागिने सराफांना विकता येणार आहेत. सराफ ग्राहकांकडून हॉलमार्क शिवाय जुने सोन्याचे दागिने परत खरेदी करणे सुरू ठेवू शकतात आणि सोन्याचे दागिने उत्पादक,

घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही. ए अ‍ॅण्ड एच सेंटरच्या वर्कफ्लो ऑटोमेशनबद्दल भारतीय मानक ब्युरोने म्हटले की, दागिन्यांच्या प्राप्तीपासून ते हॉलमार्किंगपर्यंतची प्रत्येक कामे संगणकीकृत केली जातील आणि प्रत्येक कामाची तारीख आणि वेळ असलेली संपूर्ण माहिती ठेवली जाणार आहे.

हॉलमार्किंगच्या टप्प्यापर्यंत जॉब नंबर नोंदवूनही नमुन्याबद्दल गुप्तत्ता ठेवणे आवश्यक आहे. आतापासून हॉलमार्कमध्ये सहाअंकी कोडसह बीआयएस चिन्ह आणि शुद्धता आणि अत्यंत पारदर्शकतेसाठी सराफाला देण्यात येणाऱ्या वितरण वाऊचरचा समावेश असणार आहे.

Leave a comment