सोने-चांदीचे भावही वाढत आहेत. बुधवारी सोन्याचा भाव वधारला असला तरी चांदीमध्ये घसरण सुरूच आहे. सोने 170 रुपयांनी महाग झाले असून, चांदीमध्ये 400 रुपयांची घसरण झालीय.(Gold Price Today) 

आज बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45100 रुपये इतका आहे. 24 कॅरेटचा भाव 46100 रुपये झाला. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45350 रुपयांवर स्थिर आहे.

24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 49480 रुपये आहे. आज चेन्नईत 22 कॅरेटसाठी 43500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 47460 रुपये आहे.

Advertisement

कोलकात्यात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 45550 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव 48250 रुपयांवर स्थिर आहे

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 46065 रुपये आहे. त्यात 109 रुपयांची वाढ झाली.

तत्पूर्वी सोन्याचा भाव 46126 रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव 60059 रुपये आहे.

Advertisement

त्यात 405 रुपयांची घसरण झाली. त्याआधी चांदीने 59905 रुपयांची नीचांकी पातळी गाठली.