आज 28 सप्टेंबर 2021 रोजी सोन्याचे दर कमी झाले आहेत. (Gold Rates Today) यामुळे सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा 11 हजार रुपयांनी कमी आहेत. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

Gold Rates Today 

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates Today) 45,134 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर (Silver Rates Today) 59,534 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. मात्र चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही.

Advertisement

सोन्याचे दर 11,120 रुपयांनी स्वस्त

सोन्याच्या दरात 54 रुपये प्रति रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,080 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

यानंतर सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा जवळपास 11,120 रुपये प्रति तोळाने स्वस्त मिळत आहे.

Advertisement

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्या तुलनेत सोन्याचे दर 11,120 रुपयांनी स्वस्त आहेत.

या कारणामुळे स्वस्त झाले सोन्याचे दर

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, अमेरिकी बाँडच्या यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या दरावर दबाव आहे.

Advertisement

यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.