आठड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर प्रति (Gold Rates) तोळा 47875 रुपये एवढे होते. त्यानंतर दरामध्ये घसरण होऊन, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 47816 रुपयांवर पोहोचले.

सोन्याची किंमत आठवडाभरता 59 रुपयांनी कमी झाली आहे. तर दुसरीकडे आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी चांदीचे दर प्रति किलो 61 हजार रुपये होते. शुक्रवारपर्यंत त्यामध्ये 837 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरामध्ये आणखी घसरण

Advertisement

शुक्रवारी सकाळच्या तुलनेमध्ये संध्याकाळी सोन्याच्या दरामध्ये आणखी घसरण झाली. शुक्रवारी सकाळी सोन्याचा दर 47836 रुपये इतका होता, त्यामध्ये घट होऊन संध्याकाळी तो 47816 वर पोहोचला.

मात्र दुसरीकडे शुक्रवारी संध्याकाळी चांदीच्या दरात थोडी तेजी पहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी चांदीचे दर 60094 रुपये प्रति किलो होते.

सध्यांकाळी भावामध्ये वाढ होऊन ते प्रति किलो 60155 वर पोहोचले आहेत. दरम्यान पुढील आठवड्यात सोन्या-चांदीचे भाव आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

सोन्यामधील गुंतवणुकीला फटका

गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर सातत्याने अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्थरावर म्हणजे प्रति तोळा 56 हजार इतके झाले होते.

मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात तर सोन्याचे दर 45 हजारांपर्यंत खाली आले होते.

Advertisement

मात्र त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्यात सरासरी अडीच ते तीन हजारांची वाढ होऊन ते 47 हजारांपर्यंत पोहोचले आहे.

सोन्याचे भाव सातत्याने कमी जास्त होत असल्याने गुंतवणूकदार जोखमी घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा इतर मार्गाचा शोध घेत आहेत.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत

Advertisement

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर ibja द्वारे जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता.

थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय, वारंवार अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co ला भेट देऊ शकता. भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात.

या सर्व किंमती कर आणि आकारणीपूर्वीच्या आहेत. IBJA द्वारे जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की दागिने खरेदी करताना, कर समाविष्ट केल्यामुळे सोने किंवा चांदीचे दर जास्त आहेत.

Advertisement